प्रेम…

प्रत्येकाच्या प्रेम म्हणजे काय असतं ह्याच्या संकल्पना असतात. पण खर तर प्रेम हे संकल्पनेचा पलीकडचे आहे. सगळ्याना प्रेम व्यक्त करता येत नाही. ती एक अशी भावना आहे जी जाणीव करण्या साठी असते. शब्द गरजेचे नसतात, नजरेतूनच कळते.
आपण आजच्या जगात कितीही practical राहण्याचा प्रयत्न केला तरी एक गोष्ट आपण विसरतो की आपण जन्माला येतो, भरपूर शिकतो, यश शोधतो, काम करत राहतो, पैसे गोळा करतो आणी एखाद दिवशी मरून जातो… हा सगळा अट्टाहास करून बरोबर काही घेऊन जातो तर फक्त आपल्या माणसांच्या आठवणी आणी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा सहवास. माणसाने कितीही अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला तरी त्याला कोणाचा तरी सहवास हा लागतोच. कधीतरी, कोणीतरी दोन शब्द मायेचे बोलावे अस वाटत. बर नसलं की हळुवार डोक्यावरून हात फिरवला की डोळे भरून येतात. कितीही दुःखात असलो, आणी त्याक्षणी जर कोणी घट्ट मिठीत घेतलं की उर भरून येतोच. आपल्याला जगायला जस अन्न, हवा, पाणी लागते तसच आत्मा जिवंत ठेवायला प्रेम हे लागतच.

शर्यतीच्या ह्या जगात लोक हे तर विचारतात किती कमावतो ? , घर स्वतःच आहे का?, अरे अजुनही मारुती मधून फिरतोस?…. पण खरच कोणीही हे विचारात नाही खूश आहेस का? आजच्या जगात आपण समाधानी राहण्याच विसरून गेलोय, मग खुश तरी कस राहणार. कारण एक गोष्ट मला तरी येवढीच कळते की जर खरच खुश राहायच असेल तर त्याच्यासाठी फक्त Unconditional प्रेम करण गरजेच आहे. आणी प्रेम हे गोष्टींवर करण्यापेक्षा, प्रेम हे फक्त व्यक्ती वर होते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

प्रेम ह्या भावाने वर सगळ जग फिरतय. 
नुसता पैसा कमावून आनंद भेटत नाही, जेव्हा आपण तो आपल्या जवळच्यांना वर खर्च करतो आणी जो समोरच्या चा डोळ्यात दिसतो तो खरा आनंद. 
शिखर गाठल्यावर जेव्हा, आपले सगळे कौतुक करतात आणी पाठ थोपटून शाबासकी देतात, तेच खरे समाधान. 
दिवसभराच्या काष्टा नंतर, रात्री झोपताना अंगावरून मायेचा हाथ फिरल्यावर जे मिळतं तेच सुख. 
ह्या छोट्या गोष्टी आपण नजर अंदाज करतो. पण कुठे ना कुठे आपण ह्या साठीच जगतो. आणि हो….ह्यालाच प्रेम म्हणतात. प्रेम म्हणजे जे हळुवार पणे दर्शविले जाते ते… कायम वाजत गाजत दाखवले जायची गरजच नसते. प्रेम म्हणजे करणार्‍यांने गप्प बसुन लांबून करायचे आणि मिळणार्‍याने ते कृतज्ञ होऊन जोपासायचे.

तरीही प्रेमाचा बदल्यात नेहमी प्रेम भेटतेच असही होत नाही.
हे जरुरी नाही की आपण एखाद्या वर प्रेम करतो म्हणजे तो ही आपल्याला तेव्हढाच जीव लावेल. कित्येकदा प्रेम एकतर्फीच असत. आणि हे जे एकतर्फी प्रेम असतं ना ते सगळ्यात निखळ असत. अस प्रेम करण खूप अवघड असतं पण सुखदायक सुद्धा तेव्हढच असत…. कारण ह्या प्रेमात आटी नसतात. प्रेम किती अथवा का करावे ह्याचे निर्बंध नसतात. आपण अपेक्षाच करत नाही समोरचा प्रेम करेल तरीही आपल्या प्रेमात कमी होत नाही. मुळात म्हणजे हे फक्त तुमच्या एकट्या च्या जोपासण्यासाठी असत त्यात भागीदारी नाही, मोबदल्याची गरजच नाही आणि प्रेम मोजून मापून कर अस सांगायला कोणी नाही.
आपण ठरवून, मोजून मापून प्रेम नाही करू शकत कधीच आणी जर प्रेम विचारपूर्वक झाल तर त्याला अर्थ नाही. 
खर सांगायच तर कर्म कर, फळाची अपेक्षा नको करूस ह्या प्रमाणे… प्रेम करा पण कधीच त्याच्या परतीची अपेक्षा करू नका. 
तुम्ही म्हणताल अस कस शक्य आहे. तर लांब राहून प्रेम शक्य आहे. दुसर्‍याच्या सुखात न विरजण घालता, त्याला खुश राहून देण शक्य आहे. काहीही परतीची अपेक्षा न कारता प्रेम करण शक्य आहे. 
आणी हे जे परत न मिळणारे प्रेम असतं ना, तेच खूप liberating अर्थातच आपल्या आत्म्याला मुक्त करणारे असते. कोणी आपल्यासाठी काय करतय त्याची वाट बघण्यापेक्षा, आपण आपलं सर्वस्वी पणाला लावून फक्त प्रेम करतोय ह्याच समाधान वेगळच असत. तो अनुभव वेगळाच असतो.

अस म्हणतात की “Loving someone who doesn’t love you back is like trying to fly with broken wings” ….. भरारी ही घेता येत नाही आणी उडण्याचा ध्यास ही सोडता येत नाही कारण तुम्ही उडण्यासाठी जन्माला आलेला आहात.
#shwetarb

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s